Book Creator

मी निषेध सुद्धा साधा नोंदविलेला नाही... !!

by कवी :- हर्षद

Cover

Loading...
मी निषेध सुद्धा साधा नोंदविलेला नाही... !!

मी मोर्चा काढला नाही , मी संपही केला नाही         
मी निषेध सुद्धा साधा नोंदविलेला नाही... 

मी ट्विट हि केले नाही , मी रील्स हि बनविले नाही  
मी फेमस होण्याकरिता , टिक टॉक हि केले नाही... 

मी राजकारण हि पाहिलं , मी समाजकारणही पाहिलं  
मी सत्तेसाठी असली हेराफेरी कधी पाहिलेली नाही ... 

मी गारा पडलेल्या पाहिल्या , पिकांचे हि नुकसान पाहिले
 नुकशान भरपाईचे राजकारण असे कधी पाहिले नाही...

 मोडून गेला कणा, तरीही मी हार मानलो नाही  
दाटून आले कंठ , तरीही मी कधीच रडलो नाही... 

म्हणूनच मी मोर्चा काढला नाही , मी संपही केला नाही         
मी निषेध सुद्धा साधा नोंदविलेला नाही...!! 

कवी :- हर्षद 
(पहिली ओळ कवी संदीप खरे ह्यांच्या कवितेतून घेतलेली आहे.) 
कवी संदीप खरे क्षमस्व 🙏🙏

You've reached the end of the book

Read again

Made with Book Creator

PrevNext