Loading...
जरी झाली नाही तुझी, तरी ती तुझीच आहे. कारण तुझं तिच्यावरच प्रेम तुझ्या मनातच आहे ...!तिच्यावरच तुझं प्रेम तुझ्या मनातच राहू दे,
त्यात देखील एक अंतर राहू दे,
जरी झाली नाही तुझी, तरी ती तुझीच आहे.
कारण तुझं तिच्यावरच प्रेम तुझ्या मनातच आहे II1II
नकोस बोलू तू तुझ्या ह्या भावना,
कारण होतील तुला त्या यातना,
जरी झाली नाही तुझी, तरी ती तुझीच आहे.
कारण तुझं तिच्यावरच प्रेम तुझ्या मनातच आहे II2II
तिला तू दुरूनच पाहिलं तर तो विरह नाही,
पण जवळून बोललास तर तो कलह आहे,
जरी झाली नाही तुझी, तरी ती तुझीच आहे.
कारण तुझं तिच्यावरच प्रेम तुझ्या मनातच आहे II3II
कवी:- हर्षद
{ती त्याला(मित्राला) मिळणार नाही, हे कवीला माहित होत...,
कवी आपल्या जवळच्या मित्राला खूप समजावण्याचा प्रयत्न
करत असताना कवीने केलेली हि कविता आहे.}

